प्रतिष्ठा न्यूज

धोकादायक वाढते खाजगीकरण रोखून सहकाराला उर्जितावस्था आणण्यासाठी गुलाबरावांच्या विचाराने चालावे लागेल : शरद पवार ; सहकारतिर्थ गुलाबराव पाटील शताब्दी सोहळ्याची सांगता : जीवनचरित्राचे प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सहकारी क्षेत्रातीला धोकादायक असणारे वाढते खाजगीकरण रोखून सहकाराला उर्जितावस्था आणण्यासाठी सहकारी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सहकारतिर्थ स्वर्गिय गुलाबराव पाटील यांच्या विचाराने चालावे लागेल. असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. सांगलीतील तरुण भारत स्टेडियम येथे सहकारतीर्थ स्व. गुलाबराव पाटील यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशन व शताब्दी सोहळ्याची सांगता समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार बोलत हाते.
शरद पवार यांच्या हस्ते व कर्नाटकचे माजी मंत्री तथा महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील व अनेक मंत्रीगण तथा आमदार आणि खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याबरोबरच सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्काराने राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेजी व सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सहकारतीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्काराने प्रा. शरद पाटील व रामभाऊ घोडके यांना गौरवण्यात आले.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात एके काळी वसंतरावदादा पाटील, राजारामबापू पाटील, विखे पाटील, वि. स. पागे, आबासाहेब कुलकर्णी, गुलाबराव पाटील यांनी सहकाराला चळवळीला एक दिशा देण्याचे कार्य केले. राज्य सहकारी बँक ही आशिया खंडातील उत्कृष्ट बँक होती. गुलाबराव पाटील यांनी या बँकेला पुढे नेण्याचे काम गुलाबराव पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. सहकारी चळवळीत काम करणार्‍या माणसांबद्दल वाद विवाद होतात. त्यांच्याबद्दल उलट सुलट नेहमीच बोलले जाते. पण गुलाबराव एकमेव असे होऊन गेले की ज्यांच्या स्वच्छ कपड्यावर कधी काळा डाग उटला नाही. उभे आयुष्यभर त्यांनी असेच काम केले. सहकारी चळवळीमध्ये पहिल्या सारखे दिवस आहेत की नाहीत हे मी सांगू शकत नाही. पण मला असं दिसतं सहकारी संस्थांची संख्या कमी होत आहे. आणि त्याच क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्र सहभागी होऊन काम करण्याचा प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रात साखर कारखान्यांची संख्या किती आहे? एक काळ असा होता. धनंजयराव गाडगीळांच्या नेतृत्वाखाली पद्मसिंह विखे पाटील यांच्या सहकार्याने प्रवरेला पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला. अनेक कारखाने उभे राहिले. सुरवातीचा काळ हा खासगी कारखान्यांचा होता. नंतरच्या काळात विशेषत: वसंतरावदादा, गुलाबराव पाटील, धनंजयराव गाडगीळ या संगळ्यांच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे विचारी नेतृत्व उभा राहिल्याच्या नंतर महाराष्ट्रात सहकारी साखर कारख्यान्यांची संख्या ही शंभर सव्वाशेच्या पुढे गेली. आणि खाजगी खारखान्यांची संख्या विस पंचविच्या आत होती. आता पुन्हा खाजगी कारखान्यांना प्राधान्य देण्याचे काम सभागृहातील लोक करत आहेत. त्याचा परिणाम खाजगी कारखाने वाढत आहेत. अर्थकारण हे समाजाच्या हिताचं असलं पाहिजे. गुलाबरावंचा काळ आणि आजचा काळ यामध्ये फरक आहे. पुन्हा सहकाराला उर्जितावस्था आणायची असेल तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जावे लागेल. अन्यथा खाजगी कारखान्यांच्या वाढत्या संख्येला कोणीही आवर घालू शकणार नाही. गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता आपण करतोय. सहकार चळवळीत अतिशय स्वच्छ काम करून सहकाराला ताकद देण्याचे काम स्व. गुलाबराव पाटील साहेबांनी केले आहे. सांगलीतून राज्यभर अनेकांनी सहकार चळवळीला नेते दिले. स्व. गुलाबराव पाटील यांनी राज्यबँकेचे काम अत्यंत तळमळीने केले, त्यामुळे सहकार राज्यभर व पर्यायाने देशात मजबूत झाला. असे शरद पवार म्हणाले.
कार्यक्रमास पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, आ. मोहनराव कदम, माजी मंत्री आ. सतेज पाटील, आ. विक्रमसिंह सावंत, आ. अरुण लाड, आ. जयंत आसगांवकर, आ. सुमनताई पाटील, मा. विशाल पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी तसेच राज्यभरातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत केले. आमदार विश्वजित कदम, आमदार जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, खासदार संजयकाका पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी आभार मानले.

सहकारतीर्थ स्व. गुलाबराव पाटील चौकाचे लोकार्पण
सहकारमहर्षी गुलाबराव पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता करीत असताना आयोजित विविध उपक्रमाअंतर्गत सांगली मनपातर्फे मार्केट यार्ड येथील मुख्य चौकास सहकारतीर्थ स्व. गुलाबराव पाटील चौक असे नामकरण करण्यात आलेल्या चौकाचे लोकार्पण तसेच परिसरातील सुशोभीकरण कामाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार व महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी तथा कर्नाटकचे माजी मंत्री मा.आ. एच. के. पाटील साहेब यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी समवेत इतर सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.