प्रतिष्ठा न्यूज

सोनार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे – समस्त सोनार समाजाची मागणी

आमदार सुमनताई पाटील यांना दिले निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
कवठे एकंद : पांचाळ सोनार समाज महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सोनार समाजासाठी श्री नरहरी महाराज यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
सोनार समाज अनादी कालापासून आपल्या कौशल्यातून समाजाची सेवा करीत आहेत. सध्या व्यवसायातील बदलत्या स्वरूपामुळे अनेक कारागिरावर उपासमारीची आणि बेरोजगारीची समस्या आहे. त्यामुळे समाजातील गरीब गरजू कारागिरांना बांधवांना आर्थिक उभारी मिळावी. यादृष्टीने आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गरज भागवली जाईल. यासाठी शासन स्तरावर आर्थिक तरतूद करून कायमस्वरूपी नरहरी सोनार यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून समाजातील गरजूंना लाभ द्यावा. अशी मागणी समस्त सोनार समाज बांधवांच्या कडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर तासगाव तालुका सोनार समाज बांधवाकडून तासगाव -कवठेमंकाळच्या आ. सुमनताई पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा व तासगाव तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सुरेश भाऊ पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर पोतदार,तासगाव तालुका अध्यक्ष रामकृष्ण महामुनी, उपाध्यक्ष भागवत दादा पंडित सावर्डेकर , विजय पोतदार सावळज, राजेंद्र वेदपाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत मुंबई मंत्रालय येथे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचेकडे पांचाळ सोनार समाज महामंडळ यांच्यावतीने राज्याध्यक्ष प्रकाश पोतदार कराड,सांगली जिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर पोतदार, युवा प्रदेशाध्यक्ष रवि पोतदार,सचिव निलेश पोतदार, खानापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दीक्षित ,वाशिम जिल्हा अध्यक्ष महेश साखरकर यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय येथील अप्पर सचिव निलेश पोद्दार, वाशिम जिल्हाध्यक्ष महेश साखरकर यांच्या सहकार्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आलें.

नरहरी आर्थिक विकास महामंडळासाठी प्रयत्नशील राहू – जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पोतदार

समाजातील उपेक्षित असणाऱ्या सोनार समाज बांधवांसाठी शासन स्तरावरून कायमस्वरूपी आर्थिक मदत मिळावी. नरहरी सोनार यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून सोनार समाज बांधवांना आर्थिक उभारी साठी सहकार्य करावे यासाठी राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन व निवेदन देऊन शासन स्तरावर मागणी केली जात आहे. समाजातील तळागाळातील घटकांना न्याय, उभारी देण्यासाठी नरहरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा व प्रयत्नशील राहू असे पांचाळ सोनार समाज महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पोतदार यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.