प्रतिष्ठा न्यूज

भगवान महावीर जन्म कल्याण निमित्त 2108 बॉटल्स रक्त संकलन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : भगवान महावीर यांच्या 2622 व्या  जन्म कल्याण निमित्त वीर सेवा दल मध्यवर्ती समिती आरोग्य विभाग अंतर्गत सांगली कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटक भागामध्ये 35 गावांमध्ये रक्तदान शिबिरासारखा अनोखा सामाजिक उपक्रम राबविला गेला यावेळी भगवान महावीरांनी सारे मानव जातील जगा आणि जगू द्या हा संदेश दिला त्याप्रमाणे “जगा आणि जगू द्या संदेश हा महान करूया रक्तदान आणि देऊया जीवनदान” या उक्तीप्रमाणे अनेक शाखांच्या माध्यमातून 2108 बॉटल्स रक्त संकलन करण्यात आले

अनेक गावामध्ये महावीर जयंतीच्या दोन ते तीन दिवस आधी हा उपक्रम राबविला जातो काही ठिकाणी पुढे काही दिवस हा उपक्रम राबविला जाणार आहे. महावीर कल्याणक चा उत्सव धार्मिक विधी विधानासोबत समाजासाठी भरीव काम करणे गरजेचे असल्या च्या हेतूने वीर सेवा दल मध्यवर्ती समिती आरोग्य विभाग अंतर्गत काही उपक्रम हाती घेतले होते यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर,नेत्र तपासणी शिबिर, रक्त तपासणी,शुगर तपासणी शिबिर,दंतचिकित्सा शिबिर असे अनेक आरोग्य विषयक उपक्रम या जन्म कल्याण निमित्ताने राबविण्यात आले यामध्ये रक्तदान शिबिर हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेऊन तो यशस्वी करण्यात आला.यामध्ये अनेक गावांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या निमित्ताने भगवान महावीर जन्म कल्याण चा दिवस हा चांगल्या प्रकारे समाजाला दिशा देण्याचे काम वीर सेवा दल मध्यवर्ती समिती आरोग्य विभाग अंतर्गत केल्याचं एक उत्तम उदाहरण आहे.

महावीर जन्म कल्याणक निमित्त 35 गावात रक्त संकलन

तुंग, मिनचे,वाळवा, दत्तवाड, आष्टा,मालगाव, रांगोळी, धामणी, म्हैसाळ , चिंचवड, नांद्रे ,वसगडे ,नरंदे,कसबे डिग्रज, वळीवडे, कानडवाडी, बोलवाड, दुधगाव, शिरगाव, चिंचवड, मांगुर ,आप्पाचीवाडी, जैनवाडी,सदलगा,

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.