प्रतिष्ठा न्यूज

जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ सांगलीत मराठा समाजाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला पायतानाणे हाणले; जाहीर निषेध

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. याच्या निषेधार्थ शनिवारी सांगलीत सकल मराठा समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला पायतानाणे हाणले. आणि तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवारी व्यापक बैठक घेण्यात येणार आहे.
अंतरावली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या चार दिवसांपासून शांततेने आंदोलन केले जात होते. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केला. यावेळी हवेत गोळीबार करण्यात आला. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. यामध्ये अनेक आंदोलक, महिला, मुले जखमी झाली आहेत. या घटनेचा तीव्र निषेध सांगलीत व्यक्त करण्यात आला. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
या लाठीमाराच्या निषेधार्थ आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मंगळवार दि. ५ सप्टेंबर रोजी व्यापक बैठक घेण्यात येणार आहे. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई, डॉ. संजय पाटील, शंभोराज काटकर, प्रा. पद्माकर जगदाळे, प्रशांत पवार, राहुल पाटील, नितीन शिंदे, नगरसेवक मयूर पाटील, शैलेश भोसले, नितीन चव्हाण, तानाजीराजे जाधव, रामराव सुळे, यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.