प्रतिष्ठा न्यूज

सांंगलीत मराठा सेवा संघाच्या ३३ वा वर्धापन दिनानिमित्त १०८ रूग्णवाहिका डॉक्टर आणि ड्रायव्हर यांचा सन्मान सोहळा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : मराठा सेवा संघाचा ३३ वा वर्धापन दिन सांगली येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कोरानाच्या महाभयंकर आपत्ती तसेच आपत्कालीन परिस्थिीमध्ये रूग्णांना तातडीची उपचार यंत्रणान उपलब्ध करून देणासाठी कार्यरत असणार्‍या डॉक्टर आणि ड्रायव्हर यांचा सन्मान तसेच समाजातील कर्तृत्ववान व्यक्तीचां सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम होते.
मराठा सेवा संघाच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त सांगली येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे मराठा सेवा संघ आणि श्री अण्णासाहेब शिंदे म्हैसाळकर ट्रस्ट सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इजि. सचिन पवार यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, डॉ. अजित शिंदे म्हैसाळकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात कोरोना काळात आपल्या जीवावर उदार होऊन रूग्णांना सेवा देणार्‍या १०८ रूग्णवाहिकेचे डॉक्टर व ड्रायव्हर यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक व प्रगतशिल शेतकरी संभाजी पाटील, क्रीडाक्षेत्रात योगदाने दिलेले सुभेदार मेजर शरद नागणे, सामाजिक क्षेत्रात योगदान दिलेले ऍड. बी. एन. पाटील, इयत्ता १० मध्ये जिल्हात पहिली आलेली कु. मंजीरी निलेश पाटील, शिक्षक एफ. बी. मुजावर, डॉ. अमितकुमार सुर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. दिलीप माने यांची आरोग्य उपसंचालकपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. प्रतापसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव अमृतराव सुर्यवंशी, कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, सुहास सुर्यवंशी, ऍड. तेजस्विनी सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रणिता पवार यांच्यासह विविध कक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.