प्रतिष्ठा न्यूज

उमरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी द्यावी आरोग्य मंत्र्यांकडे संभाजी ब्रिगेडची मागणी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार बालाजी पाटील सिरसाट यांनी मुंबई येथे आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्याकडे दि.16 मार्च 2023 रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे.
उमरा हे जिल्हा परिषद सर्कल चे व राजकीय दृष्टीने महत्व असलेले गाव असून येथील गावची लोकसंख्या 5 हजाराच्या वर आहे. सध्या या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून आरोग्य उपकेंद्र चालू आहे. मात्र या ठिकाणी निवासी डॉक्टर किंवा इतर आरोग्य कर्मचारी नसतात. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होते.या उमरा गावाशी 5 तांड्याचा समावेश येत असल्याने गरीब ऊसतोड व इतर गरीब लोकांची संख्या मोठी आहे. उमरा हे बाजारपेठेचे गाव असून या गावाशी-  फुलमळा तांडा, गोविंद तांडा परसराम, तांडा धनजी तांडा, ढगारी तांडा, जोमेगाव, धनंज (खु) धनंज ( बु) सुगाव, गोळेगाव, लाडका, दहीकळंबा, या गावांचा सतत संपर्क असतो. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट यांनी एका निवेदनाद्वारे मुंबई येथे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.