प्रतिष्ठा न्यूज

वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीच्या वेळेत 1 मार्च पासून बदल

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून उन्हाळ्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीच्या वेळेत दि. 1 मार्च 2024 पासून बदल करण्यात येत आहे. दि.1 मार्च पासून सकाळी- 6:00 ते दुपारी- 1:00 या वेळेत वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे.
तरी सर्व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी अपॉईटमेंट घेतलेल्या वाहनचालक, मालक यांनी त्यांचे वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाच्या तपासणीसाठी दिलेल्या वेळेत सादर करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.