प्रतिष्ठा न्यूज

शिक्षकांना नोकरी करून वेतन, पेंशन शिवाय सेवानिवृत्त व्हावे लागत आहे हेच महाराष्ट्राचे दुर्दैव : सुर्यकांत विश्वासराव

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि. 28 : मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांना जुनी पेंशन, विनाअनुदानित शाळा, वर्ग, तुकडी यांना 100 % अनुदान द्यावे, शिक्षक भरती करण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला.
आय टी आय कार्नर येथे मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, शहराध्यक्ष श्री डी. बी. नाईक, जिल्हाध्यक्ष श्री व्ही. आर. चिलवरवार यांचे हस्ते महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मोर्चास सुरूवात झाली. छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवाजीनगर, बसस्थानक, वजिराबाद, पोस्ट ऑफिस मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोंहचला.
मोर्चात एकच मिशन, जूनी पेंशन, विनाअनुदानित शाळांना 100%अनूदान द्यावे, भारत माता की जय, वन्दे मातरम् आदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सुर्यकांत विश्वासराव म्हणाले की, एकीकडे शिक्षकांना विनाअनुदानित शाळेत आयुष्यभर नोकरी करून वेतन, पेंशन मिळत नाही तर राजकीय लोकप्रतिनिधी आमदार, खासदार यांना अवघ्या 5 वर्षांत पेंशन, भत्ते मिळतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. ते पुढे म्हणाले की, मराठवाडा शिक्षक संघास माजी आमदार पी. जी. दस्तुरकर यांची प्रेरणा आहे. आम्ही शिक्षकांच्या समस्या, अडी- अडचणी सोडविण्यासाठी सदैव तयार आहोत.
यावेळी प्रा. आनंद कर्णे यांनी शिक्षकांच्या व्यथा आणि वास्तव परिस्थिती पोटतिडकीने मांडल्या. त्यांना आणि उपस्थित शिक्षकांच्या डोळयातील अश्रू पानावले.
यावेळी शिक्षकाविरोधात बोलणाऱ्या आ.प्रशांत बंब यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी मोर्चा ला ग्रामसेवक संघटना, जूक्टा, शिक्षक सेना यांसह अनेकांनी पाठिंबा दिला.
शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष अंबुलगेक, श्री तानाजी पवार सर, प्रा. परशुराम येसलवाड यांनी पाठिंबा दिला. यावेळी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने मागण्या चे निवेदन मराठवाडा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी यांचेकडे सादर करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.