प्रतिष्ठा न्यूज

वासुंबे फाट्यावरील धोकादायक वळण हटविण्याबाबत प्रशासनाचा वेळकाढूपणा प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी कागदी घोडे नाचवण्यात मग्न..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २६६ तासगाव शहराच्या बाहेरून वासुंबे हद्दीतून पुढे जातो.याठिकानी तासगाव ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील धोकादायक वळणामुळे आतापर्यंत सुमारे ५४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.तर अनेक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे.या महामार्गावर एक वर्षापूर्वी वासुंबे येथील युवक श्री सुशांत शेळके यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता,मृत्यूनंतर ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन केले होते.या घटनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे.सुमारे एक वर्षापासून ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी आमदार व खासदार यांच्या समवेत राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी, पोलीस निरीक्षक तासगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव,तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी,वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय तासगाव यांच्या समवेत अनेक वेळा चर्चा करून याठिकाणचें धोकादायक वळण काढण्याची मागणी केली आहे.परंतु राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी त्या धोकादायक वळणा बाबत अद्याप पर्यंत कोणताहि ठोस असा निर्णय घेतना नाही.प्रशासन व राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी केवळ वेळ काढू धोरण अवलंबत आहेत.दोन महिन्यापूर्वी मध्यरात्री त्या धोकादायक वळणावर अपघात झाला होता.त्या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नव्हती परंतु चार चाकी वाहनाचे व महावितरणचे इलेक्ट्रिकल पोलचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते.त्यानंतर वासुंबे गावचे ग्रामस्थ,सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व तासगाव तालुका शिवसेना प्रमुख ( ठाकरे गट ) चिंचणी ते युवा नेते अक्षय पाटील या सर्वांनी तीव्र असे आंदोलन करून कोणत्याही परिस्थितीमध्ये ते धोकादायक वळण आजच काढून टाकण्यात बाबत हालचाली गतिमान केल्या होत्या.त्यावेळी तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी आंदोलकांशी व सरपंच ग्रामपंचायत वासुंबे,व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून तहसीलदार तासगाव रवींद्र रांजणे यांच्या समवेत व राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी यांच्याशी बैठक घेऊन त्या धोकादायक वळणा बाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.तदनंतर मा तहसीलदार तासगाव,तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी,पोलीस निरीक्षक तासगाव,तासगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांना राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत धोकादायक वळण काढण्यासंदर्भात जे काही शासकीय पत्र व्यवहार,नकाशा व अंदाजपत्रक,परवानग्या याची सर्व पूर्तता करून नियोजित रस्ता कायमस्वरूपी काढण्यासंदर्भात मंत्रालयाशी पत्रव्यवहार करू असे आश्वासन राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता श्री बागवान यांनी सरपंच ग्रामपंचायत वासुंबे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधी यांना दिले होते.परंतु एक महिना झाला तरी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी – ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी – तहसीलदार तासगाव हे अजूनही पत्रव्यवहारांमध्येच गुंतलेले आहेत, त्या धोकादायक वळणा बाबत कोणीच गांभीर्याने हालचाली करताना दिसून येत नाही,सर्वजणच वेळ काढू धोरण अवलंबत आहेत असा आरोप ग्रामस्थ वासुंबे यांच्याकडून होत आहे. परिणामी अपघाताची सुरुवातीपासूनच आज अखेर मालिका चालू आहे.त्या धोकादायक वळणा बाबत प्रशासन व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी अजून किती मृत्यू झाल्यानंतर ते धोकादायक वळण कायमस्वरूपी हटवणार की अपघात व मृत्यूची मालिका अशीच चालू राहणार ?असा संतप्त सवाल नागरिकांच्या कडून प्रशासनाला व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांना विचारला जात आहे.हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी नाही लागला तर थोड्याच दिवसात वासुंबे गावचे ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.