प्रतिष्ठा न्यूज

सुंदरनगरमध्ये आयुक्त शुभम गुप्ता याना वारांगनानी बांधल्या राख्या

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीच्या सुंदर नगर वेष्या वस्तीमध्ये अनोखा रक्षाबंधन सोहळा सर्वांचे आकर्षण बनला. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सुंदर नगर मध्ये येऊन वारांगना बहिणी सोबत रक्षाबंधन साजरे केले. या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी केले होते. वारांगना महिलांच्या बंधुप्रेमाने आयुक्त शुभम गुप्ता चांगलेच भारावले.

यावेळी वारांगना महिलांनी आयुक्त शुभम गुप्ता याना राख्या बांधत रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमास महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद, सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे आदी उपस्थित होते. यावेळी महापालिकेकडून सुंदर नगर सर्व पत्री सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच सुंदर नगर परिसराची स्वच्छता बघून आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व महिलांचे अभिनंदन करीत स्वच्छता राखत असल्याबद्दल कौतुक केले. या प्रेरणादायी उपक्रमासाठी सुंदरनगर मधील वारंगा नानी आपल्या दारामध्ये आकर्षक रांगोळी काढल्या होत्या तसेच फुलांचा वर्षाव करीत आयुक्त शुभम गुप्ता यांचे या महिलांनी स्वागत केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.