प्रतिष्ठा न्यूज

माहितीचा अधिकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचायला हवा..ऍड प्रतिक चव्हाण

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांचे निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती तासगांव व बार असोसिएशन तासगांव यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती तासगांव येथे कायदेविषयक विकास शिबीर पार पडले.यावेळी अँड प्रतिक चव्हाण,विस्तार अधिकारी A.S. मोहीतें विजय कोळी,संजय गवळी उपस्थित होते.अँड चव्हाण यांनी माहितीचा अधिकार 2005 समजावून दिला त्यासोबतच या कायद्याची आवश्यकता आणि महत्व पटवून दिले.त्यासोबत सेवा हमी कायदा 2015 ची सविस्तर माहीती दिली. कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचायला हवा तरच सशक्त समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.शेवटी प्रश्नोतरांचे चर्चासत्र झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विजय कोली यांनी केले.सुत्रसंचालन श्री योगेश शिंदे यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.