प्रतिष्ठा न्यूज

महिलांच्या अंधश्रद्धेला पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार : राहुल थोरात; जिजाऊ ब्रिगेडच्या ‘सावित्री- जिजाऊ दशरात्रोत्सव’ सोहळ्यास सुरुवात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : बुवा बाबांच्या भक्तांमध्ये मोठी संख्या महिलांची असते, कारण पुरुषांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी विविध ठिकाणी मार्ग असतात, मात्र महिलांची कुचंबणा होत असते, कुटुंबातील समस्या घेऊन काळजीपोटी अशा ठिकाणी त्या जातात आणि फसतात, याला पुरुषप्रधान संस्कृती जवाबदार आहे. महिला याच सर्वाधिक बुवाबाजीच्या बळी आहेत, तसेच त्या त्याच्या सर्वाधिक वाहक देखील आहेत, उपास तापास करून आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. फसवं विज्ञान उपाशी राहण्याचे सल्ले देत, जे अत्यंत चुकीचे आहे असे मत अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी मांडले, ते मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडने आयोजित केलेल्या ‘सावित्री- जिजाऊ दशरात्रोत्सव’ सोहळ्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. दहा दिवस चालणार्या या दशरात्रोत्सव सोहळ्याची सुरुवात आज सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करुन झाली.

राहुल थोरात पुढे म्हणाले की, महिलांमध्ये विज्ञानवादी, पुरोगामी विचार रुजविण्याचे काम जिजाऊ ब्रिगेड करीत आहे. मुलींना शिकवण्याचे काम सुरू केल्यानंतर ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंना घरातून बाहेर पडून हे काम करावं लागलं, त्यावेळी स्री शिक्षणाची सुरुवात झाली, आज सर्व क्षेत्रात मुलीचं गुणवत्तेचे प्रतीक बनल्या आहेत, जो धर्मग्रंथ महिलाना तुच्छ समजतो, तो धर्म कसला ? सर्व धर्मात धर्म पालनाची जबाबदारी केवळ महिलांना दिली, त्यामुळे या जोखडातून महिलांनी सर्वप्रथम बाहेर पडायला हवं, असे आवाहन राहुल थोरात यांनी केलं.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि रॉयल अकॅडमी खंडेराजुरीच्या संचालिका डॉ. गीतांजली शिंदे म्हणाल्या की, स्त्रिया इतिहास विसरल्याने आपल्यावर गुलामगिरीची वेळ आलीय, सिंधू संस्कृती महिला प्रधान संस्कृती होती. मनुस्मृती नंतर मात्र स्त्रिया जोखडात अडकल्या, यातून बाहेर पडायला अनेक महामानवांनी काम केलं आहे, पण स्वतः महिलाना त्या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं, असे आवाहन शिंदे यांनी केले.

प्रा.गितांजली शिंदे पुढे म्हणाल्या की, सावित्रीबाईनी जी शिक्षणाची कवाडे खुली झाली, पण त्याचा स्त्रिया किती उपयोग करून घेतात, निवडून आलेल्या महिलांना राजकारणातील काहीच माहीत नसते, केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करतात, घरचे पुरुष सांगतात, म्हणून सह्या करतात, मग शिक्षणाचा उपयोग काय झाला ?, स्त्रिया इतिहास विसरल्याने आपल्यावर वेळ आलीय, सिंध राज्यात महिला प्रधान संस्कृती होती. मनुस्मृती नंतर मात्र स्त्रिया जोखडात अडकल्या, त्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी जिजाऊ, छत्रपती शिवराय,सावित्रीबाई फुले, महात्मा फुले अशा महामानवानी काम केलं, ते विसरू नका असे आवाहन डॉ. गितांजली शिंदे यांनी केलं.

कार्यक्रमाला काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका जयश्रीताई पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष प्रणिता पवार, आशा पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्ष ज्योती सावंत, अनिता पाटील, शितल मोरे, जयश्री घोरपडे, मोनिका निकम , मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ.संजय पाटील, मराठा सेवा संघाचे सचिव अमृतराव सूर्यवंशी, नगरसेविका रोहिणी पाटील, माजी जि. प. अध्यक्ष मालन मोहिते, अॅड. तेजस्विनी सुर्यवंशी, गीता पाटील, बी. एम. पवार,भास्कर पाटील आदी प्रमुख उपस्थित आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.