प्रतिष्ठा न्यूज

पलूसच्या प्रथमेश हाईटसच्या वाढीव बांधकामावर नगरपालिका प्रशासन कारवाई कधी करणार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : पलूस येथील दत्तात्रय बागल यांनी पलूस तलावनजीक प्रथमेश हाइट्स या अपार्टमेंटचें बांधकाम केले आहे. हे बांधकाम मंजूर असलेल्या बांधकाम नकाशासी सुसंगत नाही, तसेच परवानगी पेक्षा जास्त वाढीव बांधकाम केलेले आहे.त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 52 अन्वये सदरचे बांधकाम हे अनधिकृत आहे.त्यामुळे पलूस नगर परिषद  प्रशासनाने याबाबत दत्तात्रय बागल यांना 24/1/2023 रोजी अनधिकृत असणारे बांधकाम पत्र प्राप्त झालेपासून 24 तासाच्या आत काढून घेण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 52,53,54,55,56व 57अन्वये पुढील कारवाई करण्यात येईल अशी नोटीस दिली आहे.परंतु 24 तासाची मुदत दिली असताना नोटीस देऊन 12 दिवस होऊन सुद्धा अतिक्रमण काढण्यात आलेले नाही.
तसेच सदर ईमारतीतील सदनिका ८-१० जनांनां विकलेल्या आहेत. त्यात त्यांची फसवनुक सदर मालकांकडून कडुन करणेत आली असल्याचे दिसून येत आहे.
यावर नगर परिषद प्रशासन कारवाई कधी करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.