प्रतिष्ठा न्यूज

रोहित तोरस्करची खो-खो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली: २१ व २२ नोव्हेंबर २०२३ रोजी द अमॅच्युर खो-खो असोसिएशन सांगली यांच्या वतीने भानू तालीम येथे जिल्हा किशोर  व किशोरी  अजिंक्य स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये किशोर व किशोरी यांच्या एकूण ५२ संघांनी सहभाग नोंदविला होता.  या स्पर्धेमध्ये मातोश्री तानूबाई दगडू खाडे  इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मिरज या शाळेत शिकणाऱ्या रोहित तोरस्कर याची २९ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ३०० खेळाडूंमधून निवड झाली आहे. रोहितला शाळेचे क्रिडा शिक्षक स्टीफन काकी, इराप्पा कोळी व प्राजक्ता माळी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
        शाळेच्या सर्व खेळाडूंचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, सुमनताई खाडे, सुशांत खाडे, स्वाती खाडे व मुख्याध्यापिका संगीता पाटील यांनी केले. खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष  प्रशांत  इनामदार व जिल्हा खो-खो निवड समितीचे सदस्य रोहित भगत यांनी संघाचे भरभरून कौतुक केले त्याचप्रमाणे संघाला जी काही मदत लागेल ती मदत करण्याचे  आश्वासन दिले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.