प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समिती संचालक मंडळाकडून शेतकरी हिताच्या घेतल्या जाणाऱ्या निर्णयाला सहकार्य करणार : सौ.रेखा पाटील; चुकीच्या गोष्टींना ठामपणे विरोधच

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण सोसायटी गटातुन महिला प्रतिनिधी म्हणून सौ रेखा रवींद्र पाटील यांनी निवडणूक लढवली होती,अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये त्या विजयी झाल्या,त्याबद्दल त्यांनी सर्व मतदार, हितचिंतक,या सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी आपण दिलेल्या संधीचा उपयोग तालुक्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादक व इतर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बाजार समितीच्या माध्यमातून जे – जे शक्य आहे ते – ते सर्व करण्याचा प्रयत्न करनार असल्याचे सांगितले. तसेच
निवडणुक प्रचाराच्या दरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन, बाजार समितीच्या प्रगतीसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी संचालक मंडळाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला सहकार्य करण्याची भूमिका राहील.
मात्र शेतकऱ्यांच्या व बाजार समितीच्या अधोगतीला जबाबदार ठरतील अशा अहिताचे निर्णय व चुकीच्या,मनमानी पद्धतीचा कारभार निदर्शनास आल्यास त्या – त्या वेळी समर्थपणे अशा गोष्टींना ठामपणे विरोध करून प्रसंगी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागला तरी निर्भीडपणे केला जाईल असेही त्या म्हणाल्या. बाजार समितीला प्रगतीपथावर नेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मिळालेल्या संधीचा प्रामाणिकपणे उपयोग करून बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सौ. पाटील यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.