प्रतिष्ठा न्यूज

खोकुर्ले (ता. गगनबावडा) परिसरात बिबट्याचा मानवी वस्तीत शिरकाव

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : खोकुर्ले (ता. गगनबावडा) परिसरात बिबट्याने मानवी वस्तीत शिरकाव करून अनेक कुत्र्यांचा पडशा पडला असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्याच आठवड्यात येथील धोंडीराम गायकवाड यांच्या गोठ्यातून शेळी ओढून नेली होती. तर आता बाळू कसबले यांच्या घराजवळ गोठ्यामध्ये कुत्र्यावर हल्ला केला. त्यामुळे शेती व दुग्ध व्यवसाय करणारे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका भवार, वनपाल अमर वेटोळे, वनरक्षक संग्राम पाटील, वनसेवक विजय सूर्यवंशी, पांडुरंग पाटील आनंदा पाटील सर्जेराव पाटील तुकाराम पाटील व रेस्क्यू टीम बिबट्याच्या शोधात आहेत. नागरिकांनी सावधानता बाळगावी असे वन खात्यामार्फत सांगण्यात आले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.