प्रतिष्ठा न्यूज

राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेसाठी राजर्षी शाहू विद्यालय नांदेडचा संघ नागपूरला रवाना

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड :  पावनगाव ता. कामठी जि. नागपूर येथे आयोजित 40 व्या राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धा दि. 24 ते 26 नोव्हेंबर 2023 दरम्यान होणार आहेत. सदरील स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्या संघ रवाना झाला असून सदरील स्पर्धेत सहभागी खेळाडूंना जिल्ह्या अध्यक्षा  सौ. राजश्रीताई पाटील, सोनवणे साहेब, राजर्षी शाहू विद्यालय नांदेड चे मु.अ. हंगरगे बी. एम, टेनिक्वाईट खेळाचे जिल्हा सचिव बी.डी. सेन्नेवाड, प्रा.    डॉ. टी. बी. जाधव, रमाकांत महालिंगे, धनाजी बसवदे, श्रीमती मथुरा घोडेकर, बालाजी गर्जे आदिनी शुभेच्छा दिल्या. संघ व्यवस्थापक टी. एन. रामनबैनवाड, अभिजित जाधव समवेत कर्णधार करण जाधव, संकेत स्वामी, कृष्णा रावते,हर्षवर्धन राऊत, यश हिंगोले, बालाजी गायकवाड, साईश्वर चव्हाण, कर्णधार शितल उपरवाड, आरती डुकरे, श्रध्दा चदम, प्राची पतंगे, संजिवनी भवर ई. रवाना झाले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.