प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यात 8 ऑगस्ट पर्यंत विजेच्या कडकडासह वादळीवारे व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता : हवामान खात्याचा अंदाज

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक ०४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ०१:०० वाजता दिलेल्या सूचनेनुसार नादेड जिल्ह्यासाठी दिनांक ०४ ऑगस्ट २०२२ ते ०८ ऑगस्ट २०२२ या कालावधीसाठी येली (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने बादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व उगाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाण काळजी घ्यावी.

या गोष्टी करा……..
(१) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा
२) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.
(३) आपण घरात असाल आणि चरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा
४) तारांचे कुपण, विजेचे खांब व इतर लोखडी वस्तूंपासून दूर रहा
(५) पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा

या गोष्टी करू नका
1) आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लैंडलाइन फोनचा वापर करू नका. शावर खाली अघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ पाण्याची पाईपलाइन पाना स्पर्शनका तसेच कुठल्याही विद्युत
उपकरणाचा वापर करू नका
2) विजेच्या गडगडासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या लोखंडी तंबूमध्ये आसरा घेऊ नका.
३) उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.
४) धातूच्या चटाकू नका.
५) जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना बाहेर पाहु नका हे बाहेर थांबण्या इतके धोकादायक आहे.
असे आवाहन प्रदीप कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.