प्रतिष्ठा न्यूज

उमरा परिसरात पुन्हा पूरजन्य परिस्थिती अनेक गावांचा संपर्क तुटला-वाहतूक ठप्प- प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील उमरा येथील भिवरा नदीला दि.4 ऑगष्ट 2022 च्या मध्यरात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे नदी काटावरील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असुनया पावसामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला असुन जमिनी खरडून गेल्या आहेत.पूर परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमरा गावातील मातंग वस्तीपर्यंत पुराचे पाणी घुसले असुन देवतांची मंदिरे पाण्यात बुडालीआहेत.या बाबतीत गावकऱ्यांनी प्रशासनाला कळवूनही अद्याप पर्यंत प्रशासनाचा कुठलाही अधिकारी कर्मचारी गावात पोहचला नाही.


तर उमरा गावापासून ढगारी तांडा-परशराम तांडा, सुगाव – लाडका या गावांचा संपर्क तुटला असून नांदेड ते लाडका जाणारी परिवहन महामंडळाची बस सकाळ पासून उमरा नदीवर पुरामुळे अडकुन बसली आहे,या मुळे वाहतूक पुन्हा ठप्प झाली असुन राहिलेली थोडीफार पिके या पावसामुळे नष्ट होऊन मोठे नुकसान होणार म्हणुन शेतकरी पुर्ण धास्तावलेल्या अवस्थेत आहेत.तरी तालुका प्रशासनाने या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.