प्रतिष्ठा न्यूज

शिवसेनेच्या नांदेड जिल्हाप्रमुखपदी मा.आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची निवड तसेच तीन विधानसभांची जबाबदारी

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यातील हदगाव-हिमायतनगरचे माजी आमदार नागेश बापुराव पाटील आष्टीकर यांची शिवसेनेच्या नांदेड जिल्हाप्रमुखपदी निवड झाली असुन त्यांच्याकडे हदगाव-हिमायतनगर, किनवट- माहूर आणि भोकर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी ही निवड केली आहे.
त्यामुळेच हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी तीन जिल्हाप्रमुखांची निवड केली आहे. त्यात हदगावचे माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या खांद्यावर आता हदगाव, भोकर आणि किनवट विधानसभेची जबाबदारी देत त्यांची शिवसेनेच्या नांदेड जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे आणि नांदेड – हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्रीवर नांदेड :- माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली :- विनायक भिसे, संदेश देशमुख या तिघांची जिल्हाप्रमुखपदी निवड केली आहे. त्यात हिंगोली व सेनगाव संदेश देशमुख यांच्याकडे तर कळमनुरी विधानसभा विनायक भिसे यांच्याकडे देण्यात आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने हिंगोली आणि नांदेड जिह्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती यादी प्रसिद्धीसाठी देण्यात आली.
सहसंपर्कप्रमुख (हिंगोली जिल्हा) – अजय (गोपू) पाटील, जिल्हाप्रमुख (हिंगोली, कळमनुरी) – विनायक भिसे, जिल्हाप्रमुख (वसमत, सेनगाव) – संदेश देशमुख, जिल्हा संघटक (हिंगोली) – बाळासाहेब मगर, सहसंपर्क संघटक (हिंगोली जिल्हा) – ॲड. रवी शिंदे आदींची निवड करण्यात आली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.