प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी मध्ये राहुल पाटील यांनी राबविले व्यसन विरोधी अभियान

प्रतिष्ठा न्यूज/ जिल्हा प्रतिनिधी
नांदेड : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय, ज्यु. काॅलेज मध्ये ” स्वस्त भारत, सुरक्षित भारत ” या अभियाना अंतर्गत समाजसेवक राहुल पाटील( गुंटुर ता. कंधार) यांनी विद्यार्थ्यांना व्यसना विरोधात जनजागृती केली. प्रोजेक्टर च्या साहाय्याने व्यसन विरोधी अभियानांतर्गत मानवी जीवनावर होणारे व्यसनाचे दुष्परिणाम परिणाम पटवून दिले. आजच्या धावपळीच्या काळात माणूस व्यसनाधीन बनत चालला आहे. व्यसनाने
कॅन्सर, दमा, क्षयरोग, घशाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजात व्यसन विरोधी चळवळ राबवावी असे त्यांनी आवाहन केले.


श्री राहुल पाटील यांना डॉ. वंदना जोशी, डॉ. संगीता महाजन, डॉ. आश्विनी तांबे ( पेस ग्रुप, पुणे)तसेच डॉ सचिन पा. उमरेकर , डॉ. रितेश बिसेन ( जयवंत प्रतिष्ठाण नांदेड)यांची प्रेरणा मिळाली.
विद्यालयाचे प्राचार्य श्री बी. एम. हंगरगे, उपप्राचार्य डॉ. पांडुरंग यमलवाड, पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत सहशिक्षक श्री बालासाहेब माने, श्री गोपाळ मोरे, स्काऊट मास्तर राजू पवार
यांचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.