तासगाव गुरुवारचा आठवडा बाजार रथोत्सवामुळे रद्द
प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : तासगावचा पारंपरिक रथोत्सव येत्या गुरुवारी साजरा होत आहे.सदर रथोत्सवास होणारी गर्दी लक्षात घेता गुरुवारी होणारा आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे,अशी माहिती मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी फळ विक्रेते,भाजी विक्रेते,इतर विक्रेते आणि नागरिकांना गर्दी करू नये असे आवाहन केले आहे.