प्रतिष्ठा न्यूज

गगनबावडा तालुक्यातील निवडे ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन अटळ, जेष्ठ पत्रकार विनायक सणगर यांचे बंड

प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ 

गगनबावडा, ता.१२ : निवडे ( ता. गगनबावडा) ग्रामपंचायतीची या वर्षीची पंचवार्षिक निवडणूक  ऐतिहासिक ठरणार आहे. जिल्ह्याचे नेते असणाऱ्या व गटाच्या गेली २५ वर्षे ताब्यात असणाऱ्या या ग्रामपंचायतीची नि वडणूक जेष्ठ पत्रकार विनायक सणगर हे विकासाच्या मुद्द्यावर आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन एकटे लढत आहेत. संपूर्ण तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला असून परिवर्तन अटळ आहे असे जाणकारांचे मत आहे.
लोकनियुक्त सरपंच हा लोकांनीच ठरवायला हवा. या मुद्द्यावर गेली २५ वर्षातील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या “विकासाचा  पंचनामा” करत ते लोकांसमोर येत आहेत. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.
निवडे-साळवण हे तालुक्याचे मध्यवर्ती राजकीय, सामाजिक, व्यापारी केंद्र आहे. येथील ग्रामपंचायतीची सत्ता गेली २५ वर्षे ‘त्या’ गटाकडे आहे. ही निवडणूक बिनविरोध करताना काही कारभारी मंडळीनीच पुढाकार घेवून आपल्या सोयीप्रमाणे उमेदवारांची निवड केली असून सरपंच पदाची खांडोळी करून काँग्रेस  व भाजप  यांच्यात अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरविला. सदस्य व सरपंच पदाचे
उमेदवार निवडताना समस्त ग्रामस्थांना वि श्वासात घेणे गरजेचे होते. मात्र तसे न करता आम्ही म्हणतो तीच पूर्व दिशा ” असे म्हणणाऱ्या प्रवृत्ती विरोधात पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते विनायक सणगर यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे अर्ज अखेरच्या दिवशी दाखल केले आहेत. ग्रामस्थांचा मला पूर्ण पाठिंबा असून, मी भरघोस मतांनी निवडून येऊ अशी खात्री वाटत आहे. तरी जनतेने कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन पत्रकार विनायक सनगर, विवेकानंद सनगर यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.