बळीराजा पार्टीच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी प्रा.श्रीरंग कोरे यांची निवड
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा बळीराजा पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज सांगली येथिल शासकीय विश्रामगृहामध्ये बाळासाहेब रास्ते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी प्रा.श्रीरंग कोरे सर यांची बळीराजा पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याचे श्री बाळासाहेब रास्ते यांनी जाहीर केले.यावेळी जेष्ट पत्रकार चंद्रकांत गायकवाड यांच्या हस्ते नुतन जिल्हाध्यक्ष प्रा. श्रीरंग कोरे सर यांचा शॉल,फेटा,व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बळीराजा मशनरी मंचचे राज्याध्यक्ष मोझस हेगडे,तासगांव तालुकाध्यक्ष डॉ.युनुस मुलाणी,कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष पांडुरंग कोळेकर,आबा शिंगाडे,जिल्हा उपाध्यक्ष अंकुश रास्ते आदी.मान्यवर उपस्थित होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल माने यांनी प्रा.कोरे यांना सुभेच्छा दिल्या या नंतर सर्व कार्यकर्त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास प्रा.श्रीरंग कोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.