प्रतिष्ठा न्यूज

तासगावसह तालुक्यातील मटका बंद करा अन्यथा मनसे स्टाईलने बंद करू

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगांव शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी राजरोजपणे रस्त्यावर तसेच बंदीस्त जागेत रात्री अपरात्री पर्यंत मुंबई मटका चालू आहे.तासगांव शहरात अनेक ठिकाणी बाजारपेठेत तसेच सार्वजनिक ठिकाणी बंदीस्थ व खुलेआमपने मुंबई मटका झुगाराचा व्यवसाय सर्रास चालू आहे.मटका खेळल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत,त्यामुळे सामान्य कुटूंबातील लोकांना सदर व्यवसायाचा फटका बसत आहे. मटका या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक लोंक खाजगी सावकारकीचा व्यवसायही करू लागले आहेत. शहरात भर वस्तीत रहदारीचे ठिकाणी काही लोंक मोबाईल वरून सुध्दा मुंबई मटका हा व्यवसाय करताना दिसून येत आहे.याबाबत आज मनसेच्या महिला तालुकाध्यक्ष सौ.दीपाली पुंडेकर यांनी तासगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन ७ दिवसाचे आत तासगांव शहर व तालुक्यातील चालू असलेला मटक्याचा अवैद्य व्यवसाय कायम स्वरूपी बंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणेत यावी अन्यथा तद्नंतर मनसे स्टाईलने आम्ही अवैध व्यवसाय बंद पाडू असा इशारा दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.