प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगावकरीता आरफळ सिंचन योजनेतून आवर्तन सुरु : खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य स्थितीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असताना आरफळ सिंचन योजनेमधून पाण्याचे आवर्तन सुरु करणेबाबत खासदार संजयकाका पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि साताऱ्याचे पालकमंत्री मा. शंभूराजे देसाई यांच्याकडे मागणी केली. या मागणीस उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि साताऱ्याचे पालकमंत्री मा. शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून संबंधीत अधिकाऱ्यांना सांगली जिल्ह्याकरीता आरफळ सिंचन योजनेचे आवर्तन त्वरीत सुरु करणेबाबत आदेश दिले. या पाण्याच्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
खासदार संजयकाका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे आरफळ सिंचन योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरु होणे गरजेचे होते. त्यासाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि साताऱ्याचे पालकमंत्री मा. शंभूराजे देसाई यांची भेट घेवून आरफळ सिंचन योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरु करावे, अशी मागणी केली होती.
तसेच पलूस व कडेगावसहीत तासगाव तालुक्याला आरफळ योजनेतून पाणी मिळावे याकरीता आरफळ सिंचन योजनेच्या टप्पा क्र. ४ मधील तारळी लिंकचे अंतीम टप्प्यात आलेले काम लवकरात लवकर पूर्ण करुन जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणणेबाबतही मागणीही उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचेकडे खासदार संजयकाका पाटील यांनी केली. हे कामही लककरात लवकर पूर्ण करणेबाबत ग्वाही देण्यात आली.
यावेळी आटपाडी प. स. सभापती हर्षवर्धन देशमुख, भाजप प. महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, भाजप तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा प्रमूख प्रभाकर पाटील , अमोल काटकर, अंकुश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.