प्रतिष्ठा न्यूज

प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर बिले देण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी पाटील… तासगाव पालिकेकडे ठेकेदारांनाचे अडकले कोट्यावधी रुपये

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
कतासगाव : शहरातील कामे पूर्ण करून ही कामांची बिले मिळत नसल्याने संतप्त ठेकेदारांनी आक्रमक पवित्रा घेत तासगांव नगर पालिकेत धाव घेतली.यावेळी ठेकेदारांनी एकजुटीचा विजय असो अशी घोषणा बाजी करीत परिसर दणाणून सोडला. याबाबतचे निवेदन नगर पालिकेस देण्यात आले आहे.दहा दिवसाच्या आत बिले न मिळाल्यास नगर पालिके समोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा ही या निवेदनात देण्यात आला आहे.तर लवकरात लवकर बिले देण्याचा प्रयत्न राहिल असे आश्वासन प्रशासक तथा मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी दिले.
तासगांव नगर पालिका हद्दीतील कामे पूर्ण करून ही त्या कामांची बिले मिळत नसल्याने संतप्त ठेकेदारांनी शुक्रवारी तासगांव पालिकेत धाव घेतली,यावेळी ठेकेदारांनी ठेकेदार एकजुटीचा विजय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.यावेळी नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आंदोलनकर्त्यां ठेकेदारांच्या समोर गेले,त्यावेळी तासगांव नगर पालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने इंद्रजित चव्हाण,सुनिल जाधव,अजय पाटील यांचे हस्ते मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हंटले आहे की,सर्व कॉन्ट्रॅक्टरांनी गेली दोन वर्षा पासून केलेल्या कामांचे डिपॉझिट वेळेत मिळाले नाही,तसेच पूर्ण केलेल्या कामांची बिले व त्या कामांची थर्ड पार्टीसाठी मागे ठेवलेली १० टक्के रक्कम दोन दोन वर्षे मिळत नाही त्यामुळे कॉन्ट्रक्टर पूर्ण अडचणीत आला आहे.ठेकेदारांना बँकेची कर्ज, सोने गहाण तसेच कामगारांचे पैसे देता येणे अशक्य झालेली आहेत. तसेच वैशिष्यपूर्ण योजनेची कामे पूर्ण करून दोन वर्षे झाली असून त्याची बिले अजून पर्यंत मिळालेली नाहीत. नगरपालिकेने वारंवार तगादा लावून कामे पूर्ण करून घेतली पण ठेकेदारांच्या बिलांचे पहाणेसाठी प्रशासनाकडे वेळ नाही.तरी आम्हास दहा दिवसाच्या आत बिले दयावीत बिले नाही मिळाली तर सर्व कॉन्ट्रॅक्टर आमरण उपोषणास बसणार आहोत असा इशारा ही या निवेदनात देण्यात आला आहे.
लकरात लवकर बिले देण्याचा प्रयत्न राहणार-मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील…याच पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी संबधित ठेकेदारांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.तसेच प्रशासनातील त्या विभागातील कर्मचाऱ्यांशी ही तातडीने चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.याबाबत बोलताना मुख्याधिकारी पाटील म्हणाले, सन २०२३-२४ मधील सुमारे अडीच कोट रूपयांची बिले देणे बाकी असून त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर बिले देण्याचा आपला प्रयत्न राहिल…
मा.नगराध्यक्षांचा कामे करा म्हणून तगादा तर मा.उपनगराध्यक्ष बिलांसाठी ठेकेदारा बरोबर
यावेळी उपस्थित ठेकेदारांच्यातून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत होत्या. काहींनी एका मा.नगराध्यक्षांनी कामे करा असा तगादा लावला प्रसंगी प्रशासनातून नोटीसा ही काढण्यात आल्या असे बोलून दाखवले,तर ठेकेदारांच्या सोबत राहून त्यांच्या अडअडचणी सोडण्यासाठी मा. उपनगराध्यक्ष अनिल कुत्ते यांनी नेहमी साथ दिली असल्याचेही ठेकेदारांनी यावेळी बोलून दाखवले.शुक्रवारी ही अनिल कुत्ते ठेकेदारांबरोबर थांबून होते.
निवेदनावर इंद्रजित चव्हाण,अविनाश पाटील,किरण जामदार,अजय पाटील, मनोज चव्हाण,ओंकार शेटे,तुषार कदम,ओंकार सावंत,अभिषेक धाबुगडे,संजय लुगडे,अमोल हुलवाणे, उमेश गावडे,लखन पाटील,विनोद धोत्रे,सुहास शिंत्रे,राजेंद्र भंडारे,प्रकाश पाटील,चंद्रकांत मिरजकर,शुभम थोरबोले,नयन चौगुले,स्वप्निल थोरबोले,विशाल माळी,राहुल माळी, प्रकाश माळी,अनिल पवार,निवास धोत्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.