प्रतिष्ठा न्यूज

इंडिया आघाडी ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याचे समर्थन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : देशात भाजपा विरोधी सर्व पक्षांनी स्थापन केलेल्या INDIA आघाडी ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज समर्थन दर्शवण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब , सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी महिला आघाडी च्या पुढाकाराने समर्थन करण्यात आले.

इंडिया आघाडी ची राष्ट्रीय पातळीवरची तिसरी बैठक मुंबई येथे संपन्न होत आहे , या पार्श्वभूमीवर सांगली मध्ये आज इंडिया आघाडी च्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून पाठींबा देण्यात आला , गेले नऊ वर्ष भाजपा सरकार कार्यकाळात संपूर्ण देशामध्ये महागाई , बेरोजगारी , महिला अत्याचार व जातीवाद या सारख्या गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत परंतू या सर्व प्रश्नांकडे सध्याचे सत्तेतील भाजपा सरकार दुर्लक्ष करत आहेत , येणाऱ्या काळा मध्ये सर्व जनताच अश्या सरकार ला नामोहरम केल्याशिवाय राहणार नाही , अश्या भावना पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या.

यावेळी कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे , मा. नगरसेवक विष्णू माने ,हरिदास पाटील, सांगली शहर महिला अध्यक्षा अनिता पांगम ,मिरज शहर अध्यक्षा वंदना चंदनशिवे, विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्षा छाया जाधव ,उत्तम कांबळे ,युवराज गायकवाड , आयुब बारगिर ,डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे,अर्जुन कांबळे, संदीप व्हनमाने, विद्या कांबळे, अमृता चोपडे, संगीता जाधव , सुरेखा सातपुते , रुपाली कारंडे ,सुनीता जगधने , रामभाऊ पाटील, फिरोज मुल्ला ,भीमराव बेंगलोरे ,प्रकाश सुर्यवंशी,प्रकाश मदने, अरुण चव्हाण ,आप्पासो ढोले, सचिन सगरे , आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.