प्रतिष्ठा न्यूज

१३ सप्टेंबरचा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापूर येथे होणारा मोर्चा यशस्वी करण्याचा सांगलीतील बैठकीत निर्धार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली / प्रतिनिधी : बुधवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील साखर सह संचालक कार्यालयावर एफ आर् पी तील ४०० रुपये मिळावेत या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे तो मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आली
ही बैठक माधवनगर रस्त्यावरील सर्किट हाऊस येथे शुक्रवारी झाली बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे कार्याध्यक्ष संदीप राजोबा युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले आदी उपस्थित होते.
पोपट मोरे म्हणाले १३ तारखेला कोल्हापूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चाला सांगली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी जाण्यासाठी नियोजन करावे लागेल त्यानंतर सांगली लोकसभा मतदार संघ ताकदीने लढूया त्याचीही तयारी करूया महेश खराडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे त्याची तयारी जोरदार करूया
महेश खराडे म्हणाले माळे गाव आणि सोमेश्वर कारखान्याने ४०० रुपये फरकाची रक्कम देणार असल्याचे जाहीर केले आहे मात्र सांगली जिल्ह्यातील अकाही कारखान्याने अद्याप एफ आर पी ची फरक रक्कम जाहीर केलेली नाही शासकीय साखरेची किंमत ३१ रुपये होती आता ती ३८ रुपये झाली आहे ७०० रुपये वाढीव दर कारखाण्याला मिळत आहे त्यामुळे ४०० रुपये देण्यास काहीच हरकत नाही
सांगली लोकसभेची तयारी जोरात करूया राजकारणावरील लोकाचा विश्वास उडाला आहे त्यामुळे स्वाभिमानी्ला चांगले दिवस आहेत त्यामुळे त्या संधीचा फायदा घेवूया जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे नदी ओढे तलाव कोरडे पडले आहेत पिके करपून चालली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एक लाख मदत करावी चारा छावण्या सुरू करावीत यासाठी लवकरच आंदोलन केले जाईल
संदीप राजो बा म्हणाले या मोर्चासाठी ऊस वाहतूक दारानी ही या मोर्चाला पाठींबा दिला आहे मोठ्या संख्येने मोर्चात ऊस वाहतूकदार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत ४०० रुपये शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजेत त्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनीही सहभागी व्हावे
सांगली लोकसभा मतदार संघात स्वाभिमानीचे महेश खराडे असणार आहेत त्यामुळे त्याचीही जोरदार तयारी करावी लागेल ती करूया
संजय बेले म्हणाले मोर्चा दुष्काळ आणि पदयात्रा यांचे चांगले नियोजन करूया पहिला टप्पा मोर्चा यशस्वी करूया त्यानंतर दुष्काळी जनतेसाठी लढुया त्यानंतर सांगली लोकसभा मतदार संघात महेश भाऊ खराडे पदयात्रा काढणार आहेत त्या पदयात्रेत सर्व जण सहभागी होवून यात्रा यशस्वी करू या यावेळी संजय खोलखुंबे बाबा सांद्रे सुरेश वसगडे भरत चौगुले श्रीधर उदगावे बाळासाहेब लिंबे काई तानाजी साठे जगनात भोसले प्रभाकर पाटील बंडू सांदरे गुलाब यादव अजित हलीगले भुजंग पाटील नंदू नलवडे प्रकाश सटले वसंत सुतार भागवत जाधव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.