प्रतिष्ठा न्यूज

औचित्त वाढदिवसाचें तयारी विधानसभेची… महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार होण्याचा रोहित पाटील यांचा निर्धार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : अवघ्या काही महिन्यावर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे.तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातही विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून स्व.आर.आर.आबा पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी २०२४ च्या विधानसभेचा गड सर करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज त्यांचा वाढदिवस असून वाढदिवसाचें औचित्य साधून त्यांनी विधानसभेची तुतारी फुंकल्याचे दिसून येत आहे.तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ हा संपूर्ण राज्यातील संवेदनशिल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.या मतदारसंघातील स्व. आर. आर. आबा पाटील व माजी खासदार संजय काका पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष उभ्या
महाराष्ट्राने पाहिला आहे.हा संघर्ष आता दोन्ही नेत्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत येऊन ठेपला आहे.स्व. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील व माजी खासदार संजयकाका यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे.रोहित पाटील यांच्या उमेदवारीला शरद पवार साहेब यांच्याकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला असून,गेल्या काही वर्षांपासून रोहित पाटील मतदारसंघातील गाव न् गाव पिंजून काढत आहेत.सत्ता असताना व नसतानाही मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तळमळीने झटताना दिसत आहेत.
सर्वच राजकीय पक्षांच्या नेते मंडळी कडे जाऊन तालुक्यातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच विरोधी पक्षातील मंत्र्यांशी त्यांनी सलोख्याचे संबंध निर्माण केले आहेत.स्व.आर.आर.आबा पाटील यांची पुण्याई व सहानभुतीमुळे राज्यातील सर्वात तरुण आमदार होण्याचा निर्धार रोहित पाटील यांनी केला असल्याचे दिसत आहे.मतदारसंघातील विविध प्रश्न घेऊन ते जातात व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. रोहित पाटील यांनी मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांची आपुलकीने विचारपूस करून त्यांच्या मनात घरकरण्याचा प्रयत्न केला आहे.शरद पवार साहेब यांनी रोहित पाटील यांच्या रुपाने आश्वासक व युवा चेहरा निवडला असून त्यामुळेच त्यांच्या खांद्यावर लोकसभेला राज्यातील स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.राज्यातील जबाबदारी पार पाडत असतानाच रोहित पाटील मतदारसंघातही पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत.मतदारसंघातील सामान्य लोक त्यांच्या रुपाने भावी आमदार पाहत असल्याचे चित्र दिसत आहे.येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर नेमके कोणाचे आव्हान असणार याकडे संपूर्ण मतदासंघाचे लक्ष लागून राहिले आहे.मात्र समोर कोणीही असले तरी त्यांना धूळ चारण्यासाठी रोहित पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.त्यामुळे आगामी तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभेची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.