प्रतिष्ठा न्यूज

लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क रस्त्यावरील धोकादायक डिव्हायडर बदला -संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लक्ष्मी मंदिर ते चिन्मय पार्क पर्यंत जे रस्त्यामधील डिव्हायडर केलेले आहेत. त्या डिव्हायडर ची उंची खूप जास्त आहे. व थोड्या थोड्या अंतरावर दोन -तीन फुटाच्या गॅप ठेवण्यात आलेला आहे.त्यामुळे ड्रायव्हिंग करताना अचानक मध्येच कुत्री येतात. मुलं- माणसं येतात आणि ते ड्रायव्हरला दिसत नाही. त्यामुळे परिसरामध्ये एक्सीडेंट चे प्रमाण वाढलेले आहे. डिव्हायडरच्या मध्ये – गॅप ठेवलेले आहेत. ते गॅप लवकरात लवकर बंद करावेत आणि होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात ही अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी शहराध्यक्ष नितीन पवार उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.