प्रतिष्ठा न्यूज

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थीनी बांधकाम परवाना कार्यशाळेचा लाभ घ्यावा : आयुक्त शुभम गुप्ता

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत प्रधानमंत्री आवास योजना लागु असुन आजअखेर वैयक्तीक स्वरुपातील घरकुल योजनेचे ८ डिपीआर केंद्र व राज्य शासनाने मंजुर केले असुन एकुण ७३३ लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देय आहे. त्यापैकी ३६२ लाभार्थ्यांनी बाधकाम परवानगी घेतली असुन त्यापैकी ८६ लाभार्थ्यांनी बांधकाम पूर्ण केले आहे आणि १२२ लाभार्थीचे बांधकाम अंतिम टप्यात आले आहेत. तथापी १०० लाभार्थ्यांनी बांधकाम परवाना मिळाला असुनही बांधकाम सुरु केले नाही. तसेच २९८ लाभार्थ्यांनी अद्यापही बांधकाम परवाना घेतलेले नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेताना दिसत नाहीत. या बाबी विचारात घेता सदर लाभार्थ्यांसाठी प्रभाग निहाय कार्यशाळा आयोजन करण्यात येत आहे. सांगली शहरातील लाभार्थ्यांकरीता दि.८ जुलै रोजी पद्मभूषण डॉ. वसंतराव (दादा) पाटील सभागृह. मुख्यालय सांगली, मिरज शहरातील लाभार्थ्यांकरीता दि.९ जुलै रोजी मनपा सभागृह, विभागीय कार्यालय मिरज आणि कुपवाड शहरातील लाभार्थ्यांकरीता दि.१० जुलै रोजी मनपा सभागृह विभागीय कार्यालय कुपवाड येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सदर कार्यशाळेमध्ये महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे व प्रधानमंत्री आवास योजना विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजुर डिपीआर मधील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही बांधकाम परवाने काढला नाही अशा सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह सदर कार्यशाळेमध्ये उपस्थित राहुन बांधकाम परवान्याचे प्रस्ताव तपासुन घ्यावेत व मान्यतेसाठी परिपुर्ण प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने तात्काळ दाखल करावेत. दि.२५ जुलै २०२४ अखेर बांधकाम परवाना सादर न केलेले लाभार्थीची नांवे रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावांची प्राथमिक स्वरुपात छाणनी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रस्ताव दाखल केलेनंतर त्रूटी राहणार नाहीत व बांधकाम परवाने तात्काळ देण्याची कार्यवाही होईल. तरी सदर कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिके मार्फत करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.