प्रतिष्ठा न्यूज

ज्ञानेश्वरी प्रायमरी ईंग्लिश स्कूल मध्ये गोकुळ अष्टमी- दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : मारतळा येथील ज्ञानेश्वरी प्रायमरी ईंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गोकुळ अष्टमी दहीहंडी निमित्ताने राधाकृष्णाच्या विविध वेषभुषेत देखावे सादर करून मराठी व हिंन्दी गीतांच्या तालावर ठेका धरून भर रिमझिम पावसात आपल्या नृत्यकला सादर करून उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्याना मंञमुग्ध केले. त्यानंतर दहिहंडी उत्सव साजरा करून  गोपाळ काला वाटण्यात आला.
येथील ज्ञानेश्वरी प्रायमरी ईंग्लिश स्कूल मध्ये गेल्या 14 वर्षापासून बालगोपाल विद्यार्थी राधा व कृष्णाच्या रूपात वेषभुषा परिधान करून शाळेमध्ये येतात. व दहिहंडी उत्सव साजरा करतात. या वर्षीही हा उत्सव नर्सरी ते 10 वी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी  राधाकृष्णाची वेषभुषा पपरिधान करून गोकुळ अष्टमी दहीहंडीचा कार्यक्रम राधाकृष्णाच्या भोवती गोल रींगण करत आज गोकुळात रंग खेळतो हरी, कृष्णाला राधा भाळली, राधा हि बावरी या मराठी गितांसह मैंया यशोदा, ओ कृष्णा है, या गीतांवर ठेका धरत भर पावसात आपले नृत्य सादर केले. त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांनी गोविंदा रे गोपाला या गीतांवर ठेका धरत दहिहंडी फोडून उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थी गोपाळकाला वाटप केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका- प्रिया सामला, कान्होपाञा तिरमाले, सुनिता झिंझाडे, कौशल्या डापरवाड, स्वाती कपाळे, चांगुणा भरकडे, रूपाली कुलकर्णी, सिमा जोंधळे, आसमा शेख, संजीवनी साखरे, कविता ईर्लेवाड, छाया कोलते, यांच्यासह शिक्षक- पुरूषोत्तम जोशी, विलास गोणारे, शंकर पवार, जीवा बोईनवाड, शेख, सुनिल तारू, आनंद जाधव यांनी मुख्याध्यापक- संजय पाटील ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.