प्रतिष्ठा न्यूज

मालगावकरांना शनिवार १६ सप्टेंबर रोजी पाहायला मिळणार कबड्डी स्पर्धेचा थरार

प्रतिष्ठा न्युज/योगेश रोकडे
मिरज : मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव येथे शासकीय शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. या स्पर्धा सोमवार दि ४ सप्टेंबर रोजी  होणार होत्या परंतु पावसामुळे होवू शकल्या नाहीत. तरी या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांनी याची नोंद घ्यावी व पुढील तारखेस वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
        या कार्यक्रमाचे नियोजन खाडे स्कूल करत असून यासाठी अधिक माहितीसाठी क्रिडाशिक्षक आदिनाथ गायकवाड यांना संपर्क साधावे मोबा – +91 90214 52616 / +918788713801
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.