प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय लोकअदालतीत सांगली जिल्ह्यामध्ये दीड हजार प्रकरणे निकाली रुपये 20 कोटी वसूल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 11 : सांगली जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील एकूण 1565 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच सदर लोकअदालतीमध्ये सांगली जिल्ह्यातून एकूण रक्कम रुपये 19 कोटी 99 लाख 39 हजार 231 रुपये इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रविण नरडेले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगलीतील सर्व तालुक्यांमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी.के.शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. भदगले, जिल्हा न्यायाधीश क्रमांक 2 पी. बी. जाधव व जिल्हा न्यायाधीश क्रमांक 3 डी.वाय.गौड हे उपस्थित होते.
सदर लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण सांगलीचे सचिव प्रविण नरडेले यांनी नियोजन केले, सदर लोकअदालतीच्यावेळी पक्षकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.