प्रतिष्ठा न्यूज

विकसित भारत अभियान सांगली महापालिका प्रभावीपणे राबविणार : आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी लाभार्थ्यासाठी कॅम्प लावले जाणार

केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले विकसित भारत अभियान महापालिका प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी दिली.

महापालिकेत आयोजित आढावा बैठकीत आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार बोलत होते.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, संजीव ओव्होळ, उपआयुक्त राहुल रोकडे आणि सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना आयुक्त तथा प्रशासक पवार यांनी विकसित भारत अभियांतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी ,यासाठी मनपा क्षेत्रात विविध ठिकाणीमोठ्या प्रमाणात लाभार्थ्यासाठी माहिती कॅम्प लावले जाणार आहेत. या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही आयुक्त तथा प्रशासक पवार यानी प्रशासनाला आढावा बैठकीत दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.