प्रतिष्ठा न्यूज

उपचारा विना मोराचा मृत्यू झाला नाही म्हणणार्या अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी- लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कुपवाड हद्दीतील एका शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या मोरास वन विभागातील दोघा कर्मचाऱ्यांनी मोटरसायकल वरून उपचारासाठी घेऊन जात असतानाच उपचारापूर्वीच मोराने प्राण सोडल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती .या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी घटना घडल्यानंतर लगेचच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तसेच वन मंत्रालयाचे सचिवांकडेही निवेदन सादर करून सदर कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली होती.त्यानुसार वनमंत्र्यांनीही या चौकशीचे आदेश दिले होते .परंतु नागपूर अधिवेशनात शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला असता तशी घटना घडलीच नसल्याचा जावई शोध वन विभागाने लावलाय.या संदर्भात लोकहित म्हणजेच अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज मानसिंगराव नाईक यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा केली असता आमदार मानसिंग भाऊ नाईक यांनी मंगळवारी आणखी प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान वनमंत्र्यांनी त्या दिवसांची वर्तमानपत्रे, सोशल मीडिया,यू ट्यूब न्यूज चॅनलच्या बातम्या तपासाव्यात दूध का दूध पानी का पानी होईल. त्याचबरोबर खोटे म्हणणे मांडणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी .अशी मागणी मनोज भिसे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.