प्रतिष्ठा न्यूज

बोरगाव येथे कडकडीत बंद, मराठा आंदोलकावर लाटीचार्जबद्दल राज्य सरकारचा निषेध

प्रतिष्ठा न्यूज / सौरभ निकम 
निंबळक प्रतिनिधी : बोरगांव ता. तासगाव येथे जालना जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीचार्ज व राज्य सरकारचा निषेध करणेसाठी बोरगांव गावातील सर्व व्यवहार कडकडीत बंद पाळुन करणेत आला. यावेळी गावातील मराठा तरूणांनी निषेध मोर्चा काढला.
मराठा क्रांती मोर्चा अत्यंत शांततापूर्ण मार्गाने काढणाऱ्या, लाखोंच्या संख्येने असतानाही कुठेही सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान मराठा मोर्चा ने केले नाही. परंतु जालना येथे या आंदोलकांवर पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही सर्व समाज व ग्रामस्थांच्यावतीने जाहीर निषेध करतो. तसेच पोलीसांना असे आदेश देणाऱ्या या राज्यकर्त्यांचा निषेध आम्ही करतो.अश्या भावना आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
यावेळी बोरगाव गावातील  स्वप्नील पाटील, युवराज पाटील, प्रमोद पाटील, रविंद्र पाटील, विशाल पाटील, सागर पाटील, पै. आकाश जाधव तसेच गावातील तरुण आणि नागरिक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.