प्रतिष्ठा न्यूज

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. “कष्टकर्यांचे कैवारी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्वाचे नेते हि शाहीर आण्णाभाऊ साठेंची महाराष्ट्राला ओळख आहे. पण जे हलाखीचे आणि गरीबांचे आयुष्य जगले त्याचे प्रत्ययकारी चित्रण त्यांनी आपल्या कादंबऱ्या मधून केले. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या आणि त्यावर चित्रपट हि निघाले. समाजातील वंचित लोकांच्या जीवनावरील कादंबऱ्या मुळे रशियन लेखक प्रभावित झाले आणि अण्णाभाऊंच्या सर्व कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या. सर्व साहित्य रशियात अनुवादित झालेला हा देशभरातील एकमेव साहित्यीक होय.” तसेच टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखलगांवी झाला. स्वातंत्र्यसाठी लढणारी जी अनेक रत्ने होती. त्यांतील हे रत्नागिरीचे ‘रत्न’ होते. त्यांचे ‘केशव’ हे नांव ठेवण्यात आले होते. पण ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी लढा दिला. . असे विचार भाजपाचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य श्री. प्रकाश तात्या बिरजे यांनी व्यक्त केले. आमदार गाडगीळ संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सभागृह नेत्या भारती दिगडे, ज्येष्ठ नेते श्रीकांततात्या शिंदे, माधुरी वसगडेकर, प्रीती मोरे, गौस पठाण, गणपती साळुंखे, प्रदीप कार्वेकर, श्रीधर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.