प्रतिष्ठा न्यूज

आरगमध्ये पार पडलेल्या स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्डची होणार चार बुक मध्ये नोंद…

प्रतिष्ठा न्युज/ योगेश रोकडे
मिरज :  येथील अरग येथे  पँथर स्केटिंग क्लब पुणेच्या वतीने स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्डचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव, प्रोग्रेस स्केटिंग क्लब आरग व थोरात स्केटिंग अकॅडमी तासगाव येथील ३५ मुलांनी सहभाग नोंदवला. यावेळी न थांबता वंदे मातरम् यासारख्या देशभक्तीपर गीतावर मुलांकडून साधारण  एक तास स्केटिंग करण्यात आले. हा उपक्रम अरग गावातील वरद मल्टिपर्पज हॉलमध्ये घेण्यात आला. त्यासाठी  सतीश थोरात व आदिनाथ गायकवाड यांचे  नियोजन व मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाची चार  वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद करण्यात येणार आहे. त्याची नावे द मिरॅकल इंडिया, ग्लोबल जिनिअस रेकॉर्ड, होप इंटरनॅशनल रेकॉर्ड व वज्र वर्ल्ड रेकॉर्ड. या उपक्रमाचे उद्घाटन माजी डेप्युटी सरपंच डॉ. अनिल कोरबू आणि पालक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुलांचा, पालकांचा व ग्रामस्थांचा उत्साह पाखणण्याजोगा होता.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.