प्रतिष्ठा न्यूज

शिक्षक सेनेच्या तालुकाध्यक्षपदी- प्रकाश फुलवरे तर संघटकपदी- रामदास इंदुरे यांची निवड

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : नांदेड शिक्षक सेनेची बैठक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख- माधव पावडे यांच्या रिंगरोड येथील संपर्क कार्यालयात घेण्यात आली. यावेळी शिक्षक सेनेच्या नांदेड तालुकाध्यक्ष पदी- प्रकाश फुलवरे तर तालुका संघटकपदी- रामदास इंदूरे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिक्षक सेनेचे राज्यउपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाप्रमुख- माधव पावडे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, जिल्हा सरचिटणीस- रवि बंडेवार, जिल्हा मार्गदर्शक- शिवाजी पाटील, शिक्षक- संजय बकवाड, शेवडी केंद्राचे केंद्रप्रमुख- नागोराव जाधव, संग्राम चिंचोरे व कस्तुरे हे उपस्थित होते.
यावेळी रवी बंडेवार- यांनी शिक्षक सेनेचे ध्येय धोरणे, संघटन वाढविणे, सभासद नोंदणी करणे, न्यायासाठी लढा देणे, शिक्षक सेनेने केलेल्या सामाजिक उपक्रमा बद्दल माहिती दिली.
तर नांदेड पतसंस्थेचे सभासद करण्यासाठी फार्म देण्यात आले, तसेच ई-मॕन्डेड फार्म वाटप करण्यात येऊन जास्तीत जास्त ई-मॕन्डेड फार्म भरुन द्यावे असे आवाहन करण्यात आले, कर्ज, ठेव, शेअर्स माहिती देण्यात आली व सहकार कायद्या बाबत संचालक- संतोष अंबुलगेकर यांनी माहिती दिली .
तसेच अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना- विठुभाऊ चव्हाण म्हणाले की, प्रथम विध्यार्थी हे आपले दैवत आहेत हे शैक्षणिक कर्तव्याचे काम करून संघटना वाढीसाठी जोमाने व दिलेल्या वेळेत काम करणे गरजेचे आहे यात कसून करू नये असे म्हणाले. यावेळी नुतन अध्यक्ष- फुलवरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी शाळा तेथे शिक्षक सैनिक सभासद नोंदणी करणार असे आश्वासन दिले.
शेवटी नुतन अध्यक्ष व तालुका संघटक यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.