प्रतिष्ठा न्यूज

“जागतिक अवयवदान दिनी” भरकड व वानखेडे यांनी केला देहदानाचा संकल्प

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : “मरावे परी देहरुपी उरावे” जागतिक अवयवदान दिनानिमित्त दि.13 ऑगस्ट 2023 रोजी  मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष- प्रा.दगडू भरकड व भाजपाचे तालुका उपाध्यक्ष- बबनराव वानखेडे यांनी देहदान संकल्प करून आपण स्वइच्छेने देहदान करीत असल्याचा डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, शरीररचना शास्र या विभागास देहदान फॉर्म भरून गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक- डॉ.घडसिंग यांच्याकडे सुपूर्त केला. एक मृतदेह 7 जणांना जीवदान देऊ शकतो तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करू शकतो याचा अर्थ एका मृतदेहा मुळे सुमारे 42 लोकांना आपले आयुष्य पूर्ववत जगण्यास मदत होते म्हणून “अवयवदान श्रेष्ठ दान” मानले जाते. दगडू भरकड व बबनराव वानखेडे यांच्या या संकल्पनेबद्दल किनवट माहूरचे आ.भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी- एस.कीर्तीकेयन, तहसीलदार- डॉ.मृणाल जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख- बालाजी पाटील सिरसाट यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.
   ●प्रतिष्ठा न्युज कडुन खुप खुप शुभेच्छा…..💐
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.