प्रतिष्ठा न्यूज

तासगावकरांच्या सेवेत रोगराई प्रतिबंधक औषध फवारणीसाठी 2 नवीन ट्रॅक्टर आणि 2 नवीन फॉगिंग मशीन दाखल…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरात कसल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नयेत म्हणून औषध फवारणी करण्यासाठी तासगाव नगरपरिषद आरोग्य विभागातर्फे शहरातील रोगराईला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.या उपाययोजनेत भर म्हणून पालिकेच्या ताफ्यात दोन नवे ट्रॅक्टर व दोन fogging मशीनचा समावेश करण्यात आला आहे.
शहरात सध्या अनेक साथीच्या रोगांचे रुग्ण आढळून येत आहेत.डेंग्यू गोचीड तापाची साथ आली आहे.यापूर्वी नगरपरिषदेकडे अपुरी यंत्रसामग्री असल्याने संपूर्ण शहरात एकाच वेळी औषधे व धूर फवारणी करताना समस्या निर्माण होत होत्या.आता मात्र, नगरपरिषदेच्या ताफ्यात औषधे फवारणीसाठी दोन नवे ट्रॅक्टर व दोन fogging (धूर फवारणी मशीन) दाखल झाल्याने आरोग्य विभागाला शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगले सहाय्य मिळणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.