प्रतिष्ठा न्यूज

तासगाव अर्बन बँक पुणे विभागातील उत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक्स असोसिएशन लि. मुंबई यांचे वतीने प्रतिवर्षी राज्यातील उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या बँकांना पुरस्काराणे सन्मानीत करणेत येते.महाराष्ट्र बँक्स असोसिएशन कडून शनिवार दि. ०९/०९/२०२३ रोजी नाशिक येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये पुणे विभागातून दि तासगांव अर्बन को-ऑपरेटीव्ह बैंक लि.तासगांव या बँकेस उत्कृष्ट बँक म्हणून पद्मभुषण कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक या पुरस्काराने सन्मानीत करणेत आले.सदरचा पुरस्कार हा मा. खा.श्री.सुरेश प्रभु माजी केंद्रीय रेल्वे मंत्री व मा.श्री.अनिल कवडे सो, सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते बँकेचे चेअरमन,व्हा. चेअरमन व संचालक यांना प्रदान करणेत आला.महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन यांच्या मार्फत कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार दि तासगांव अर्बन बँकेस जाहीर करणेत आला होता.त्याचा वितरण सोहळा माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु, सहकार आयुक्त अनिल कवडे, सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे, राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करणेत आले.बँकेचे अध्यक्ष श्री. महेश्वर हिंगमिरे,उपाध्यक्ष श्री.कुमार शेटे,बँकेचे संचालक श्री.अरुण पाटील,श्री.विनय शेटे,श्री उदय वाटकर श्री.रामशेठ शेटे,श्री.राजेंद्र माळी,श्री सौरभ हिंगमिरे,व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री प्रदिप पवार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्रीकांत कुलकर्णी प्रसिध्द व्यापारी श्री. शशीकांत काळगी,श्री.सुरेश पैलवान यांनी हा पुरस्कार स्विकारला. दुष्काळी भागात कार्यरत असलेल्या तासगांव अर्बन बँकेने बँकिंग व्यवसायामध्ये आपला एक ठसा उमटविला असून राज्यातील सर्व बँकांपुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे.तासगांव अर्बन बँकेचे कार्यक्षेत्र सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्हयामध्ये विभागलेले असून सध्या बँकेच्या सर्व नऊ शाखा ह्या सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. शाखा विस्तार वाढीसाठी बँकेस विटा, पंढरपूर व सोलापूर या ठिकाणी नवीन तीन शाखा उघडणेसाठी रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळालेली असून लवकरच सदरच्या शाखा सुरु होतील.
माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू व सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी बँकेच्या कामकाजाबाबत कौतुक केले. रु. १०० कोटी ते २५० कोटीपर्यंत ठेवी असलेल्या गटातून पुणे विभागामधून एकमेव तासगांव अर्बन बँकेचा या पुरस्काराने सन्मान करणेत आला.बँकेच्या ग्राहकांनी बँकेच्या सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी यांचेवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरविलेला असून सहकारातील एक उत्कृष्ट व आदर्श बँक म्हणून मिळालेला सन्मान सतत आठवणीत राहणार असलेची भावना बँकेचे अध्यक्ष महेश्वर हिंगमिरे, उपाध्यक्ष श्री. कुमार शेटे, बँकेचे संचालक श्री. अरुण पाटील, श्री. विनय शेटे, श्री उदय वाटकर श्री. रामशेठ शेटे, श्री. राजेंद्र माळी, श्री सौरभ हिंगमिरे, व्यवस्थापन मंडळ सदस्य श्री प्रदिप पवार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्रीकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.