प्रतिष्ठा न्यूज

चिंतामणी नगर येथील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची गती आणखीन वाढवा रेल्वे प्रशासनाकडे आंदोलनकर्त्यांची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : चिंतामणी नगर येथील  रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम  जलद गतीने करून  10 सप्टेंबर पूर्वी एकेरी वाहतूक सुरू करून  30 सप्टेंबर पर्यंत  पुलाचे काम पूर्ण करू  असे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाने चाबूक फोड आंदोलनाच्या वेळी  आंदोलनकर्त्यांना दिले होते  त्या पार्श्वभूमीवर  आज 10 सप्टेंबर  रोजी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू होते का कामाची स्थिती काय आहे  याची प्रत्यक्ष पाहणी माजी आमदार नितीन शिंदे, व्यापाऱ्यांचे नेते  प्रदीप बोथरा, उद्योजक मनोज साळुंखे, रेल्वे बांधकाम विभागाच्या  वरिष्ठ अभियंता  सौ. उत्कर्षां कसबेकर, आर पी एफ  विभागाचे प्रमुख पाल  यांच्या समवेत  पाहणी केली यावेळी वरिष्ठ अभियंता म्हणाले की, मुरूम उपलब्ध न झाल्यामुळे  भरावाचे काम शिल्लक राहिले आहे ते काम करण्यासाठी आम्हाला आठ ते दहा दिवस द्यावे* *एकेरी वाहतूक सुरू करू  तसेच कामाच्या ठिकाणी येऊन काम कशा पद्धतीने सुरू आहे कामावर किती कामगार काम करत आहेत ही माहिती आपण घेतल्याबद्दल त्यांनी आंदोलनकर्त्यांचे कौतुक केले.
यावेळी व्यापाऱ्यांचे नेते प्रदीप बोथरा म्हणाले की, रखडलेल्या  उड्डाणपुलाचे काम आत्ताच्या गतीने केले असते  तर पुलाचे काम कधीच पूर्ण झाले असते. व जनतेचे नुकसान टळले असते आत्ता वाढवलेल्या गती पेक्षा  आणखीन गती वाढवून  30 सप्टेंबर पूर्वी पूल पूर्ण करा.
यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, *दिवाळी व दसरा हे दोन सण तोंडावर आले आहेत या सणापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे कोरोना व महापुरात  व्यापाऱ्यांचे व जनतेचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. सांगलीची व्यापार पेठ उध्वस्त व्हायचे नसेल व जनतेला त्रासातून मुक्त करायचे असेल तर 30 सप्टेंबर पूर्वी पूल पूर्ण करा. आमदार खासदारांनी  लक्ष घालून  कमी पडत असलेल्या गोष्टी उपलब्ध करून  देऊन पुलाचे लवकर पूर्ण करून घ्यावे.
यावेळी  हनुमंत नरळे, गणेश सूर्यवंशी, अनिरुद्ध कुंभार, नंदकुमार पवार, वसीम इनामदार, इरफान मुल्ला, आकाश काळेल, आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.