प्रतिष्ठा न्यूज

लवकरच करुळ घाटातील खड्ड्यांचे ग्रहण कायमस्वरूपी मिटविणार : आ. नितेश राणे यांनी करूळ घाट मार्गाची केली पाहणी

प्रतिष्ठा न्यूज
गगनबावडा प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार नितेश राणे यांनी करूळ घाटाची पाहणी केली. एडगाव, करूळ व गगनबावडा हा मार्ग अक्षरशा खड्ड्यात गेला आहे. या मार्गे प्रवास करणे देखील अवघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी पाहणी दौरा केला.
शासनाचा पैसा हा जनतेसाठी वापरा. आम्ही तुमच्या खिशातले पैसे मागत नाही आहोत. चुकीचे पाऊल आम्हाला उचलायला भाग पाडू नका. असे खडे बोल आमदार नितेश राणे यांनी अधिका-यांना सुनावत धारेवर धरले.  अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच करूळ घाटाची दुर्दशा होत आहे. असा आरोपही त्यांनी केला. घाटातील गटारेे साफ करून खड्डे तात्काळ भरा. कारणे कोणाचीही ऐकून घेणार नाही. असे राणे यांनी महामार्गाचे उपकार्यकारी अभियंता श्री अतुल शिवनिवार यांना सांगितले.

*या घाट मार्गाला २५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.*
ईरशाळवाडी सारखी घटना घडू नये, यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. या घाट मार्गाला २५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याची प्रोसिजर अजूनही सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाने हा मोठा निधी प्राप्त झाला आहे.
जीएसबी मटेरियलने खड्डे भरा. स्थानिक ठेकेदारांना विश्वासात घेऊन गटर व खड्डे भरण्याचे काम करा. असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले .

* भुईबावडा घाटाप्रमाणे हा देखील मार्ग केला जाईल.*

     येणाऱ्या काही दिवसात हा मार्ग निर्धोक होईल.  केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे काम आपल्याला सर्वांना माहीत आहे. जिल्ह्यातील विकास कामांकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे देखील लक्ष ठेवून आहेत. मागिल अधिवेशनात पालकमंत्री चव्हाण यांनी या घाटासाठी निधीची घोषणा केली आहे. लवकरच घाटाच ग्रहण कायमस्वरूपी सुटेल  असे ठाम पणे आम. नितेश राणे यांनी सांगितले.
यावेळी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, नेहा माईणकर, सुधीर नकाशे, सज्जन काका रावराणे, बंड्या मांजरेकर, संजय सावंत, विवेक रावराणे, महीला पदाधिकारी प्राची तावडे, नवलराज काळे, प्रदीप रावराणे, रोहन रावराणे, संताजी रावराणे, सुभाष रावराणे, प्रकाश सावंत, योगेश पाथरे, तहसीलदार दिप्ती देसाई, गटविकास गटविकास परब, पोलीस निरीक्षक मेंगाडे सर्व नगरसेवक, शक्तीकेंद्र प्रमुख व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जीएसबी मटेरियलने खड्डे भरले जातील. गटारे साफ केली जातील. त्याचबरोबर घाटात कायमस्वरूपी जेसीबी उपलब्ध केला जाईल असे शिवनीवर यांनी सांगितले.कामे दोन दिवसात सुरू करणार : उपकार्यकारी अभियंता अतुल शिवनिवार यांची कबुली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.