प्रतिष्ठा न्यूज

भारतीय संविधान का वाचावे? ग्रंथाचे 7 एप्रिलला प्रकाशन

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : निर्मिती प्रकाशन, प्रकाशित ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि भारतीय संविधानाचे अभ्यासक प्रा. डॉ. श्रीपाद देसाई लिखित पंचवीस हजार ग्रंथांची पहिली आवृती एका वर्षात संपलेल्या भारतीय संविधान का वाचावे? का वाचवावे? या महत्वपूर्ण सैद्धांतिक ग्रंथाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. 7 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 1:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र राज्याचे सदस्य प्रा. डॉ. सोमनाथ कदम, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. वसंत भागवत उपस्थित राहणार आहेत.
कार्यकामाच्या अध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. स्मिता गिरी या असून निर्मिती प्रकाशनचे प्रकाशक अनिल म्हमाने, संवाद प्रकाशन प्रकाशिका प्रा. डॉ. शोभा चाळके या निमंत्रक आहेत.
कार्यकामाचे आयोजन पुजा जाधव, नामदेव मोरे, अश्वजित तरटे, सई कांबळे यांनी केले असून सदर प्रकाशन समारंभास संविधान प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.