प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा पोलीस दलात ४० पदांसाठी १७५० अर्ज; उमेदवारांनी अमिषाला बळी पडू नये : पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे आवाहन; बुधवार पासून भरती प्रक्रिया

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांकरीता २७ रिक्त पदे, चालक पोलीस शिपाई पदांकरीता १३ रिक्त पदे अशा एकुण ४० रिक्त पदासांठी बुधवार दिनांक १९ जून पासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भरती करीता येणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडु नये, तसेच भरती प्रक्रिये संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असलेस सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत केले.

भरतीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारां कडुन दिनांक १५/०४/२०२४ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत आले होते. नमुद पदांकरीता एकुण १७५० अर्ज प्राप्त झाले आहेत. सदरची भरती प्रक्रिया सांगली पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानावर दिनांक १९/०४/२०२४ रोजी सकाळी ६.०० वा. पासुन सुरु होणार आहे. सदरची प्रक्रिया पारदर्शक पणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कक्षेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये योग्य त्या पोलीस बंदोबस्तात घेणेत येणार आहे. भरती करीता येणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडु नये, तसेच भरती प्रक्रिये संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असलेस सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. सदरच्या भरती प्रक्रियेत प्रमाणपत्र तपासणी, शारिरीक मोजमापे व उमेदवारांची शारिरीक चाचणी परीक्षा ही खालील प्रमाणे दिनांक १९/०६/२०२४ ते २१/०६/२०२४ यादरम्यान सांगली पोलीस मुख्यालय मैदान येथे घेणेत येणार आहे.

१) दिनांक १९/०४/२०२४ रोजी सकाळी ०६.०० वा. उमेदवारांना प्रथम पासुन बोलाविणेत आले असुन त्यांच्या ऑनलाईन ओळख प्रवेशपत्रा वरुन ओळख पटवुन त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

२) उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची छाननी करुन कागदपंत्रामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांची छाती, उंची मोजणी करण्यात येईल.

३) पोलीस शिपाई, व चालक पोलीस शिपाई यासाठी मैदानी शारिरीक चाचणी करीता पुरुष उमेदवारांसाठी १६०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे, गोळा फेक तसेच महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे व गोळाफेक अशी मैदानी शारिरीक चाचणी घेणेत येईल.

४) मैदानी शारिरीक चाचणी घेतल्या नंतर उमेदवारांना मिळालेल्या गुणांची माहिती समक्ष त्यांना दाखविण्यात येणार असुन गुणपत्रका वर त्यांची स्वाक्षरी घेणेत येणार आहे.

५) मैदानी चाचणीच्या दिवशी पावसामुळे मैदानी चाचणी होवु न शकल्यास उमेदवारांना पुढील योग्य तारीख देण्यात येईल.
६) उमेदवारांनी वेगवेगळया पदांकरीता एका पेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केला असल्यास आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल.

७) उमेदवारांना भरती प्रक्रिये संदर्भात काही अडचणी असल्यास त्यांचे अडचणीचे निराकरण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडुन जागीच केले जाईल.

८) सर्व पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडीओग्राफी, सीसीटीव्ही मध्ये चित्रीत करुन पारदर्शक पद्धतीने राबविली जाणार आहे. उमेदवारांना कोणी बेकायदेशीर प्रलोभन देत असल्यास त्याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयास, अगर भरती प्रक्रियेतील पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास तात्काळ आणुन द्यावी.

वरील प्रमाणे उमेदवारांना सदर पोलीस भरती बाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आवाहन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.