प्रतिष्ठा न्यूज

गगनबावड्यातील जखमी अवस्थेत फिरणाऱ्या जनावरांची दखल घेण्याची गरज

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा :ता.१७ : गगनबावड्या मध्ये अनेक जनावरे मोकाट फिरत असतात. सध्या त्यातील काही गाईंना पाठीवर जखमा झालेल्या आहेत. लंपी सदृश्य दुर्धर आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांनी  व पशुसंवर्धन प्रशासनाने माहिती घेऊन त्यांच्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे.
” गगनबावडा मध्ये अशा जखमी अवस्थेत आठ ते दहा गाई फिरत आहेत. अशी जनावरे इतरत्र करीत राहिल्यास अनेक पशुधनांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ नये म्हणून संबंधित प्रशासनाने दखल घेऊन योग्य कारवाईकरावी.”
        भास्कर माने, सरपंच ग्रामपंचायत सांगशी -सैतवडे, अध्यक्ष, ग्राहक पंचायत, गगनबावडा 
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.