प्रतिष्ठा न्यूज

मिरज सिव्हिल हॉस्पिटलचा जैविक कचरा व्यवस्थापन करण्यास हॉस्पिटलचे प्रशासन असमर्थ पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली :  मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे अधिष्ठाता कार्यालया शेजारीच उघड्यावर हॉस्पिटलचा जैविक कचरा टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर आणला आहे. खरेतर मध्यंतरी एका खाजगी हॉस्पिटलचा जैविक कचरा असा उघड्यावर टाकल्या कारणाने दस्तुरखुद्द आरोग्य विभागाने संबंधित हॉस्पिटलवर मोठा आर्थिक दंड ठोठावला होता. मात्र स्वतःच्या दिव्याखालील अंधार असल्याचे त्यांना जाणवत नाही का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कोरोना व इतर संसर्गजन्य आजार पसरत असल्याने सध्या संपूर्ण जग आता ताक हि फुंकून पीत असताना मिरज सिव्हिलच्या अधिकाऱ्यांना याची थोडी देखील फिकीर नाही हि खूप दुर्दैवी बाब आहे. असे उघड्यावर वापरलेले सिरिंज व मुदतबाह्य औषधे पडली असताना खास याकामासाठी नेमलेले दोन सुपरव्हायजर नेमके काय काम करतात हेच कळत नाही. याच बरोबर जैविक कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने एका कंपनीला मोठी रक्कम देऊन पाचारण केले असताना देखील असा प्रकार घडतो हे खूप क्लेशदायक आहे. याबद्दल मा. जिल्हाधिकारी यांना रीतसर तक्रार देऊन लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत आम आदमी पार्टी पाठपुरावा करणार असा इशारा पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला यांनी आज माहिती देताना सांगितले. त्यांच्या सोबत रिक्षा संघटना अध्यक्ष संभाजी मोरे, सांगली शहर समिती उपाध्यक्ष अरिफ मुल्ला, मिरज शहरचे शिवाजी गायकवाड व युवा आघाडीचे सचिव निसार मुल्ला व इतर आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.